बातम्या

Trending:


वैभव सूर्यवंशीवर दबाव टाकून, आर अश्विन स्पष्टच बोलला, हे फार भयानक कॉम्बिनेशन

R Ashwin on Vaibhav Sooryavanshi: भारतीय क्रिकेटचा माजी दिग्गज खेळाडू आर अश्विनने राजस्थान रॉयल्सचा (RR) 15 वर्षीय खेळाडू वैभव सूर्यवंशी ज्या प्रकारे कमी वयातही मोठ्या गोलंदाजांचा सामना करताना संकोच बाळगत नाही ते अधोरेखित केलं आहे.


PAK VS BAN: 60 फोर, 588 रन्स अन् 15 सिक्स, PSL ची ट्रॉफी जिंकवणारा बाबर आझम टीममधून 'आऊट', ICC ने दिली बॅड न्यूज

Babar Azam Ruled out vs Bangladesh : आयपीएलनंतर सुरू झालेल्या पाकिस्तान सुपर लीगचा शेवट झाला आहे. पाकिस्तानचा स्टार खेळाडू बाबर आझम याच्या नेतृत्वाखाली पीएसएलमध्ये पेशावरने यंदाची ट्रॉफी उंचवली. बाबर आझमने या लीगमध्ये धुंवाधार बॅटिंग केली. 60 फोर आणि 15 सिक्ससह त्यानं 588 रन्स काढल्या अन पेशावर ट्रॉफी जिंकून दिली. मात्र, पाकिस्तान सुपर लीग जिंकल्यानंतर बाबर आझमला मोठा धक्का बसला आहे.पहिल्या टेस्टसाठी बाबर आझम बाहेर?पाकिस्तान आणि बांग्लादेश...


अखेर गौतम गंभीर मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, टीम इंडियाला मिळणार नवा कोच, शेवटी तो आलाच

भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर लवकरच मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. भारतीय संघाला आता अनुभवी असा नवा प्रशिक्षक मिळणार आहे. या प्रशिक्षकाचे नावदेखील समोर आले आहे.


रोहित शर्मा बनला 'पाकिस्तान'चा कॅप्टन, Live सामन्यात मोठा ब्लंडर, प्लेइंग इलेव्हनमध्येही सगळे भारतीय!

मुंबई : भारतामध्ये सध्या आयपीएल सुरू असतानाच बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यात दोन टेस्ट मॅचच्या सीरिजची पहिली टेस्ट मॅच सुरू आहे. मिरपूरच्या शेर-ए-बांगला नॅशनल स्टेडिययमध्ये हा सामना सुरू आहे, पण या मॅचच्या दुसऱ्या दिवशी रोहित शर्मासह टीम इंडियाचे खेळाडू ही टेस्ट मॅच खेळताना दाखवण्यात आले, त्यामुळे जगासमोर बांगलादेश क्रिकेटचं हसू झालं आहे.दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रादरम्यान पाकिस्तानची प्लेईंग इलेव्हन दाखवली गेली, त्यात पाकिस्तानी खेळाडूंऐवजी...


साताऱ्याचा तिरंदाज साहिल जाधवने रचला इतिहास, तिरंदाजी वर्ल्ड कपमध्ये जिंकले ब्राँझ, लेकरासाठी आईने विकलेले दागिने

Sahil Jadhav News : सातारचा सुपुत्र जाधव याने तिरंदाजी वर्ल्ड कपमध्ये ब्राँझ पदक जिंकले आहे. साताऱ्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. कोराना काळात वडिलांची नोकरी गेल्यानंतर आईने लेकरासाठी दागिने विकले होते.


‘सरपंच’ श्रेयसचा जाणून घ्या संभाव्य टीम इंडिया कॅप्टनपर्यंतचा प्रवास

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात तीन आयपीएल संघांनी फायनलमध्ये धडक मारली.


RCB vs MI: हार्दिकचं कमबॅक होणार? की सूर्या पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी सांभाळणार? पाहा मुंबई इंडियन्सची संभावित प्लेईंग ११

Royal Challengers Bengaluru vs Mumbai Indians Playing 11: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणाऱ्या सामन्यासाठी कशी असेल मुंबई इंडियन्सची प्लेईंग ११? जाणून घ्या.


पुन्हा मौका मौका! क्रिकेटच्या मैदानावर 'या' तारखेला भिडणार भारत पाकिस्तान, वर्ल्ड कपमध्ये रंगणार हायव्होल्टेज सामना

IND VS PAK : यंदा इंग्लंडमध्ये आयसीसी महिला टी20 वर्ल्ड कप खेळवला जाणार असून यात टीम इंडियाचा पहिलाच सामना हा पारंपरिक विरोध असलेल्या भारत - पाकिस्तान यांच्यात होणार आहे. त्यामुळे भारतीय महिला संघाकडे पाकिस्तानला क्रिकेटच्या मैदानात हरवण्याची नामी संधी आहे.


क्रिकेट बोर्डाच्या ऑफिसवर पडला दरोडा, बंदूक रोखून इतक्या पैशांवर मारला डल्ला

त्रिनिदाद आणि टोबैगो क्रिकेट बोर्डाचे हे ऑफिस कौवामध्ये क्लिफोर्ड रोच ड्राइव्ह येथे स्थित आहे. या ऑफिसमध्ये दिवसाढवळ्या चोरांनी दरोडा टाकला.


Sachin Tendulkar: 'पोरा हेलमेट कुठंय?', पुण्याच्या टिळक रोडवर रेंज रोव्हरची काच खाली आली अन् प्रकट झाला क्रिकेटचा देव!

Sachin Tendulkar Pune Viral Video : पुणे तिथं काय उणे... असं म्हणतात. पुण्यातली लोकं म्हणजे लय हट्टी.. ना कधी सिग्नलचे नियम पाळणार ना कधी डोक्यावर हेलमेट...असं काहीसं सोहमच्या बाबतीत घडलं. आपली गाडी काढून सोहम फेरफटका मारायला निघाला. ना डोक्यावर हेलमेट, ना उन्हातान्हात डोक्यावर घातलेली टोपी... पण नियती आज त्याच्यासोबत असं काही घडवणार होती, ज्याची कल्पना त्याने स्वप्नात देखील केली नसेल. गाडी घेऊन सोहम मरगजे टिळक रोडवर पोहोचला अन् त्याच्या...


ऋषभ पंतची एक मोठी चूक आणि CSK ने जिंकलेला सामना खेचून आणला; शेवटच्या ओव्हरमध्ये नेमकं काय घडलं?

चेन्नई: क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे असं म्हणतात, पण कधीकधी अनिश्चितता नशिबामुळे नाही तर चुकीच्या निर्णयामुळे येते. दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील अटीतटीच्या सामन्यात असंच काहीसं पाहायला मिळालं. विजयाच्या उंबरठ्यावर असलेल्या दिल्लीने केवळ एका चुकीमुळे सामना गमावला आणि सोशल मीडियावर कर्णधार ऋषभ पंतवर टीकेची झोड उठली आहे.विजयासाठी हव्या होत्या 6 चेंडूत 10 धावामॅच अत्यंत रोमांचक वळणावर होती. चेन्नईला शेवटच्या ओव्हरमध्ये...


IPLमध्ये हनी ट्रॅपचा संशय, अँटी करप्शनला मोठा क्लू, हॉटेलवर पडणार धाड; टीम मॅनेजरच्या परमिशनशिवाय कुणालाच नाही एन्ट्री

Bcci Advisory to IPL teams : आयपीएल २०२६ मध्ये अचानक बीसीसीआयने आठ पानांचे पत्र सर्व संघांना पाठवले आहे. कारण पडद्यामागे काहीतरी घडल्याची चर्चा आहे. पण नेमकं काय झालं हे माहिती नाही. हनी ट्रॅपच्या धोक्याची शक्यताही वर्तवली गेली आहे. नेमकं काय झालं हे जाणून घ्या.


विराट-रोहित कुणीच सेफ नाही... रहाणेने बिघडवला सगळ्यांचा गेम, प्ले-ऑफचं समीकरण फिस्कटलं!

दिल्लीने दिलेलं 143 रनचं आव्हान केकेआरने 14.2 ओव्हरमध्ये फक्त 2 विकेट गमावून पार केलं. फिन ऍलनने नाबाद 100 रन केले तर ग्रीनने 33 आणि रहाणेने 13 रनची खेळी केली. केकेआरचा या मोसमातला हा सलग चौथा विजय आहे. मोसमातल्या पहिल्या 6 सामन्यांमध्ये केकेआरला एकही विजय मिळाला नव्हता, पण नंतर मात्र केकेआरने दणक्यात कमबॅक केलं आहे. केकेआरने 10 सामन्यांमध्ये 4 विजय मिळवले आणि 5 सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला, तसंच त्यांचा एक सामना पावसामुळे रद्द झाला. 9 पॉईंट्ससह केकेआर सातव्या क्रमांकावर आहे. केकेआरने उरलेल्या 4 सामन्यांमध्ये 4 विजय मिळवले तर त्यांच्या खात्यात 17 पॉईंट्स होतील आणि केकेआर प्ले-ऑफमध्येही प्रवेश करेल. केकेआरच्या या विजयामुळे मुंबईसह इतर टीमचं टेन्शनही वाढलं आहे. पहिल्या 6 सामन्यांपैकी एकही मॅच जिंकली नसल्यामुळे केकेआर प्ले-ऑफच्या रेसमधून बाहेर आहे असं वाटत होतं, पण आयपीएलच्या शेवटच्या टप्प्यात टेबल टॉपर टीमची कामगिरी ढासळल्यामुळे केकेआरच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. 11 सामन्यांमध्ये 7 विजयांसह हैदराबाद पहिल्या क्रमांकावर आहे. त्यांच्या खात्यात 14 पॉईंट्स आहेत, तर पंजाबचे 10 सामन्यात 6 विजयांसह 13 पॉईंट्स आहेत. आरसीबी, राजस्थान, गुजरात यांचे 10 सामन्यांमध्ये 6 विजयांसह 12 पॉईंट्स आहेत. तर सीएसकेने 10 सामन्यात 5 विजयांसोबत 10 पॉईंट्स मिळवले आहेत. केकेआरच्या खात्यात 9 पॉईंट्स आहेत. दिल्लीचे 11 सामन्यात 8, मुंबईचे 10 सामन्यात 6 आणि लखनऊचेही 10 सामन्यात 6 पॉईंट्स आहेत. केकेआरच्या या विजयाचा सर्वाधिक फटका दिल्ली, मुंबई आणि लखनऊला बसला आहे. केकेआरने उरलेल्या 4 सामन्यांमध्ये 3 विजय जरी मिळवले तरी त्यांचे 15 पॉईंट्स होतील. या परिस्थितीमध्ये मुंबई, दिल्ली आणि लखनऊने त्यांच्या उरलेल्या सर्व मॅच जिंकल्या तरी ते 14 पॉईंट्सपर्यंत जातील, त्यामुळे ते केकेआरला मागे टाकू शकणार नाहीत. आयपीएलचा आतापर्यंतचा इतिहास बघितला तर प्ले-ऑफमध्ये चौथी टीम 14 पॉईंट्सवर क्वालिफाय होते. केकेआरच्या या विजयामुळे आणि पावसाचा एक पॉईंट मिळाल्यामुळे मुंबईसह दिल्ली, लखनऊच्या अडचणी वाढल्या आहेत.


Hardik Pandya : मुंबई इंडियन्सचं नवा कॅप्टन निवडण्याचं टेन्शन मिटणार? हार्दिक पांड्याबाबत मोठी अपडेट समोर, RCB विरुद्ध खेळणार की नाही?

Will Hardik Pandya Play Against RCB: मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पांड्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध खेळणार की नाही याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.


IPL 2026 playoffs : सलग चौथ्या विजयानंतर KKR सुसाट पण 4 टीम्सची झोप उडाली! कसं असेल प्लेऑफचं समीकरण?

DC vs KKR IPL 2026 Playoffs : कुणाला अपेक्षा नव्हती असा विजय केकेआरने खेचून आणले आहेत. सलग 5 पराभवानंतर केकेआर प्लेऑफमधून बाहेर गेली, असं सर्वजण म्हणत असताना केकेआरने सलग 4 विजय मिळवला आहे. यानंतर केकेआरसाठी आता प्लेऑफचा रस्ता साफ दिसून येऊ लागलाय. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली कोलकाताने दिल्ली कॅपिटल्सला पराभवाचं पाणी पाजलं. 15 व्या ओव्हरमध्येच कोलकाताने रनचेस पूर्ण केला अन् प्लेऑफच्या दिशेने आगेकूच केली आहे. अशातच आता केकेआरसाठी प्लेऑफचं...


आयपीएल 2026 दरम्यान कॉमेंटेटरने केली मोठी चूक, BCCI आलं ऍक्शन मोडमध्ये, पाठवणार कायदेशीर नोटीस

IPL 2026 : बीसीसीआय आयपीएलमध्ये भ्रष्टाचार विरोधी नियमांना सक्तीने लागू करत असून याअंतर्गत खेळाडू, अधिकारी, टीम मेम्बर्सचे कुटुंब आणि ब्रॉडकास्टर्सवर मोठी कारवाई सुरु केली आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार कॉमेंट्री करत असलेल्या काही माजी क्रिकेटर्सला सामन्यादरम्यान सुरक्षित क्षेत्रात व्हिडीओ बनवल्यामुळे फटकारण्यात आलं आहे.


DC vs KKR: टॉस होण्याआधीच हारली होती दिल्ली कॅपिटल्स, अजिंक्य रहाणेच्या लक्षात आलं पण अक्षर पटेलकडून घोडचूक!

दिल्लीच्या अरूण जेठली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि केकेआर यांच्यात सामना झाला. पण घरच्या मैदानावर दिल्लीला विजय मिळवता आला नाही. दिल्लीला 142 रन्स डिफेन्ड करता आले नाहीत. अक्षर पटेलने टॉसच्या आधीच घेतलेला एक निर्णय केकेआरसाठी गेमचेंजर ठरला. पीच पाहता अजिंक्य रहाणेने पथिराणाला खेळवलं नाही पण अक्षर पटेलला पीचचा अंदाजच आला नाही. अक्षर पटेलने फास्टर बॉलर मुकेश कुमार आणि स्पिनर विपराज निकम याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली. तर केकेआरने बॅटिंग स्ट्रेंथ असलेल्या केकेआरला मैदानात उतरवलं होतं. याचाच परिणाम असा झाला की, दिल्लीला बॅटर्स कमी असल्याने फक्त 142 धावा उभा करता आल्या. दिल्लीकडून ओपनर्स आणि अशुतोष शर्मा वगळता इतर कुणालाही मोठा स्कोर उभा करता आला नव्हता. तर केकेआरच्या स्ट्रॉग बॅटिंग लाईनअपने दोन विकेट गमावता विजय मिळला. यामध्ये सलामीवीर फिन एलन याने धुंवाधार शतक देखील ठोकलं. 212.77 च्या स्ट्राईक रेटने त्याने खेळी केली तर कॅमरून ग्रीनने 33 धावा कोरल्या.


Prince Yadav : प्रिंस यादवचं स्वप्न पूर्ण होणार; टीम इंडियात बुमराहच्या जागी खेळणार?

Prince Yadav: प्रिंस यादव याने आयपीएल 2026 स्पर्धेत आतापर्यंत बॉलिंगने आपला ठसा उमटवला आहे. बीसीसीआय 10 सामन्यांत 19 विकेट्स मिळवणाऱ्या या गोलंदाजाला टीम इंडियात संधी देणार असल्याचं म्हटलं जात आहे. जाणून घ्या.


क्रीडा शिबिरांचे पीक जोमात, क्रिकेटसह अन्य खेळांकडेही ओढा; आनंदापेक्षा ओझे होत असल्याचेही निरीक्षण

क्रिकेटपुरता मर्यादित असणारा उन्हाळी शिबिरांचा घेराही विस्तारून बॅडमिंटन, टेबल टेनिस, पिकल बॉल, बास्केटबॉल अशा विविध क्रीडा प्रकारांना स्पर्श करतो आहे. अर्थात, सर्वाधिक पसंती क्रिकेटच्या शिबिरांनाच आहे.


चार बॉलमध्ये अख्खी मॅच फिरली, राजस्थान रॉयल्सच्या हातातोंडाशी आलेला विजय हिसकावला, गुजरातने कशी मॅच जिंकली?

आयपीएलमध्ये आज गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा 77 धावांनी पराभव केला आहे. गुजरातच्या या विजयाची शिल्पकार हा राशीद खान ठरला आहे. गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करताना 229 धावा केल्या होत्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्स 152 धावांवर ऑलआऊट झाली होती. त्यामुळे गुजरातने हा सामना 77 धावांनी जिंकला. खरं तर गुजरात टायटन्सने दिलेल्या 229 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सची सूरूवात चांगली झाली नव्हती.कारण यशस्वी जयस्वाल अवघ्या 3 धावांवर बाद झाला होता. जयस्वाल बाद झाल्यानंतर ध्रुव जुरेल मैदानात आला होता. यावेळी राजस्थान रॉयल्सच्या डावात तिसरी ओव्हरला सिराजने वैभव सूर्यवंशीला 36 धावांवर बाद केले होते. त्यानंतर शिमरन हेटमायर 6 धावांवर बाद झाला.त्याच्या पाठोपाठ ध्रुव जुरेल 24 वर बाद झाला होता. जुरेलनंतर डोनोवन फरेरा मैदानात होता पण तो 4 धावांवर बाद झाला. त्याच्यानंतर शुभम दुबे 15 वर आऊट झाला. रविंद्र जडेला चांगल्या लयीत खेळत होता. पण तो 38 धावांवर बाद झाला.जडेजा आऊट होताच राजस्थान रॉयल्सच्या विजयाच्या आशा संपल्या. त्यानंतर दासून शनाका 16, जोफ्रा आर्चर 5 आणि तुषार देशपांडे 1 धावावर बाद झाला. अशाप्रकारे राजस्थान रॉयल्स 152 धावांवर ऑलआऊट झाली होती. त्यामुळे गुजरातने हा सामना 30 धावांनी जिंकला. दरम्यान या सामन्यात 4 बॉलमध्येच मॅच फिरली होती. कारण राशीद खानने त्याच्या ओव्हरमध्ये चार महत्वपूर्ण विकेट घेतल्या होत्या.त्यामुळेच ही मॅच फिरली होती.


कुस्तीपटू विनेश फोगट न खेळताच चीतपट, राष्ट्रीय मानांकन स्पर्धेत नाकारला प्रवेश, नेमकं काय कारण?

Vinesh Phogat News: भारतीय कुस्ती महासंघ आणि विनेश फोगट यांच्यातील वाद थांबण्यास तयार नाही. विनेशने पुनरागमन करताना जागतिक कुस्ती महासंघाच्या उत्तेजक प्रतिबंधक नियमाचे पालन केलेले नाही, असे सांगून तिला गोंडा येथे आज, रविवारी सुरू होणाऱ्या राष्ट्रीय मानांकन स्पर्धेत प्रवेश नाकारला आहे.


आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, तरी पृथ्वी शॉला का संधी नाही, दिल्ली कॅपिटल्सने खरं कारण सांगितलं

आयपीएलमध्ये शुक्रवारी कोलकत्ता नाईट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्स संघाचा 8 विकेट राखून पराभव केला होता. दिल्ली कॅपिटल्सच हा सातवा पराभव होता.या पराभवामुळे दिल्ली 11 सामन्यात 8 गुणांसह आठव्या स्थानी आहे. आता दिल्लीचे उर्वरीत तीन सामने उरले आहेत. हे सामने जिंकून त्यांना 14 गुणांपर्यंत पोहोचता येणार आहे. पण ही गोष्ट खूपच अवघड आहे. त्यात आत दिल्लीच काय चुकतंय हे आपण जाणून घेऊयात. दिल्लीच्या पराभवामागे सलामी जोडी कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. कारण दोन्ही खेळाडू दिल्लीच्या डावाला चांगली सूरूवात करून देण्यात अपयशी ठरतात. अशापरिस्थितीत पृथ्वी शॉच्या रूपात दिल्लीकडे चांगली सलामीवीर उपलब्ध नसताना त्याला संधी का दिली जात नाही? असा सवाल आता चाहते उपस्थित करत आहेत. दिल्ली कॅपिटल्स संघाचे क्रिकेट संचालक वेणुगोपाल राव यांनी यावर भाष्य केले आहे. खेळाडू पुरेशी जबाबदारी घेत नाहीयेत, असे वेणुगोपाल राव यांनी दिल्लीच्या पराभवा मागचं कारण सांगितलं आहे. जेव्हा तुम्ही बॅटींगमध्ये अपयशी ठरतात, तेव्हा कुणालाही तरी जबाबदारी घ्यावीच लागेल. दुसरा कुणीतरी येऊन करेल याची वाट पाहण्यापेक्षा मी ते करेन, असा विश्वास गरजेचा असतो. पण ही गोष्ट खेळाडूंमध्ये कमी पडते आहे, असे वेणुगोपाल राव यांनी सांगितले. पृथ्वी शॉ ला संधी देण्याच्या मुद्यावर बोलताना वेणुगोपाल म्हणाले, केएल राहुल आणि पथून निसांकापैकी आम्ही कुणाला वगळावे. अक्षर सारखा वर्ल्ड कप विजेता खेळाडू खराब फॉर्ममधून जातो आहे, हे पाहून दु:ख वाटतंय.पण आम्ही आशा सोडलेली नाही. आम्हाला अक्षर सारखाच कर्णधार हवा होता, जो दोन वर्ल्डकप विजेत्या संघाचा भाग आहे.अक्षरने चांगली कामगिरी करावी अशी आमची इच्छा आहे. त्याचा फॉर्म हरवला आहे. पण तो लवकरच पुनरागमन करेल अशी आम्हाला वाटते, असे वेणुगोपाल म्हणाले आहेत. वेणुगोपाल यांनी पृथ्वी शॉवर बोलणे टाळले आणि याउलट त्यांनी दोन्ही सलामीविरांची पाठराखण केली.


गुजरातचा राजस्थानवर दणदणीत विजय, शुबमन गिलचा संघ प्लेऑफपासून फक्त १ पाऊल दूर; रशीदची फिरकी ठरली गेमचेंजर

GT vs RR Highlights: गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा मोठा पराभव करत गुजरातचा संघ थेट गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे.


बीसीसीआय हनी ट्रॅपमुळे सतर्क, 8 पानी पत्रात रियान परागला नाव न घेता इशारा, चुकीला माफी नाही

IPL 2026 : आयपीएल सुरू असताना खेळाडूंच्या कथित गर्लफ्रेंड चर्चेत असतात. मात्र यामुळे हॉटेलमध्ये कोणीही जाईल आणि खेळाडूंसह, सपोर्ट स्टाफ कोणीही हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकू नये यासाठी बीसीसीआय सतर्क झाले आहे. सर्व संघांना आठ पानी सूचना दिल्या असून यामध्ये ई-सिगरेटबाबतही सांगितलं आहे.


विराट कोहली, प्रियांका चोप्राला मोठा धक्का, रातोरात गायब झाले लाखो इन्स्टाग्राम फॉलोअर्स; कारण समोर

विराट कोहली, प्रियांका चोप्रा, ख्रिस्तियानो रोनाल्डो, कायली जेनर यांसारख्या जागतिक स्तरावरील सेलिब्रिटींच्या इन्स्टाग्राम फॉलोअर्सच्या संख्येत अचानक मोठी घट झाली आहे. विराटचे वीस लाखांहून फॉलोअर्स कमी झाले आहेत. हे कशामुळे झालं, ते समजून घेऊयात..


२ अस्वल विरुद्ध १ वाघ, झाली मोठी लढाई, मृत्यूच्या या खेळात कोण जिंकलं? ताडोबामधील व्हिडीओ व्हायरल

Maharashtra Tiger Video: ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील मामा या प्रसिद्ध वाघावर दोन अस्वलांनी हल्ला केला. अस्वल आणि वाघामध्ये घनघोर युद्ध झालं. या लढाईचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


Finn Allen: आयपीएल स्पर्धेत न्यूझीलंडकडून 11 वर्षांनी शतक, कोणत्या देशाकडून सर्वाधिक सेंच्युरी? जाणून घ्या

आयपीएल 2026 स्पर्धेत शतकांचा वर्षाव सुरू आहे. आतापर्यंत 11 खेळाडूंनी शतकं ठोकली आहेत. यात आता न्यूझीलंडच्या फिन एलनचा समावेश झाला आहे. न्यूझीलंडकडून 11 वर्षानंतर आयपीएलमध्ये शतक ठोकणार दुसरा फलंदाज ठरला आहे. चला जाणून घेऊयात..


विश्वचषक विजेत्या खेळाडूच्या घरी सापडला एअरलाइन्सच्या Ex-CEO चा मृतदेह! अटक वॉरंट जारी; नेमकं काय घडलं जाणून घ्या

Kapila Chandrasena, Aravinda de Silva: वर्ल्ड कप विजेत्या क्रिकेटरच्या घरी सापडली एका मोठ्या एअरलाइन्सच्या CEOची बॉडी सापडली असून यामुळे क्रिकेट जगतात खळबळ उडाली आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे ते जाणून घ्या...


Team India new T20 captain: मोठी बातमी! श्रेयस अय्यर नाही, संजू सॅमसन भारतीय संघाचा नवा टी20 कर्णधार?

Team India New T20 Captain: बीसीसीआय सूर्यकुमार यादवच्या जागी नवीन कर्णधाराची घोषणा करण्याच्या तयारीत आहे. टीम इंडियाला तिसरे टी-20 विश्वचषक विजेतेपद मिळवून देणाऱ्या सूर्याच्या जागी श्रेयस अय्यरची निवड होईल असा अंदाज आधी बांधला जात होता, परंतु तो टी-20 संघाचा भाग नसल्याने संजू सॅमसनकडे टीम इंडियाची धुरा सोपवण्याची तयारी बीसीसीआयने केली आहे.


आरसीबीने सामना कुठे गमावला? मॅचनंतर रजत पाटीदारने सगळ्या चुका बोलून दाखवल्या

Rajat Patidar On RCB Loss Agianst LSG: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु आणि लखनौ सुपर जायट्ंस यांच्यात आयपीएल 2026 चा सामना रंगला. या सामन्यात लखनौचा दमदार विजय झाला.


फिन एलनचे शतक अन् केकेआरचा दमदार विजय; दिल्लीच्या पदरी पुन्हा निराशाच; प्लेऑफचं गणित बिघडलं

KKR vs DC IPL 2026: कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये सामना खेळवला गेला. या सामन्यातही दिल्लीचे वाईट प्रदर्शन पाहायला मिळाले आणि सामना केकेआरने जिंकला.


फ्रेंच टेनिस स्पर्धेवर अव्वल टेनिसपटू बहिष्कार का घालणार?

अरिना सबालेन्काने फ्रेंच स्पर्धेतील पुरुष आणि महिला सामन्यांच्या वेळापत्रकातील तफावत मांडत आयोजकांवर गंभीर लिंगभेदाचे आरोप केले असून बहिष्काराचे आवाहन केले आहे.


Mumbai Indians वर धडकणार 5.20 कोटींची तोफ! 10 मॅचपासून मोक्कार बसवून ठेवलंय, ट्रॅक ड्राईव्हरचं पोरगं सांभाळणार RCB चं स्टेअरिंग

IPL 2026 ची प्लेऑफची चुरस अधिकच रंगतदार झाली आहे. सहा टीमने दुहेरी आकडा गाठला असून आरसीबीकडे पुन्हा एकदा ट्रॉफी नावावर करण्याची संधी आहे. त्यासाठी विराट आपलं ब्रम्हास्त्र बाहेर काढणार आहे. आरसीबीसाठी आता आगामी चार सामने महत्त्वाचे असणार आहेत. आगामी सामना मुंबई इंडियन्सशी होणार असून आरसीबी त्यात एका ट्रक ड्राईव्हरच्या पोराला मैदानात उतरवण्याची शक्यता आहे. ट्रक ड्राईव्हरचा हा मुलगा आरसीबीने लिलावात 5.20 कोटींना खरेदी केला होता. मात्र, त्याला गेल्या 10 मॅचमध्ये एकदाही संधी मिळाली नाही. त्यामुळे आता मुंबईविरुद्ध आरसीबी आपला हंटर चालवण्याची शक्यता आहे. ट्रक ड्राईव्हरचा हा मुलगा दुसरा तिसरा कुणी मसून मंगेश यादव आहे. याच मंगेश यादवने डोमेस्टिक क्रिकेटमध्ये आपला जलवा दाखवला होता. लेफ्ट हँडर असलेलेल्या या मंगेशचा प्रवास खूपच खडतर राहिला होता. टीम सध्या जोश हेजलवूड, भुवनेश्वर कुमार आणि रसिख डार सलाम या त्रिकुटावर विश्वास दाखवत आहे. त्यामुळे आता जर मंगेशला खेळवायचं असेल तर रसिख डार सलामला बाहेर बसवावं लागणार आहे. त्यामुळे आरसीबी ही रिस्क घेणार का? हे पहावं लागेल.


केकेआरचा विजयाचा चौकार, पॉइंट टेबलमध्ये कमबॅक, टॉपच्या संघांचे धाबे दणादले, सीएसकेसह मुंबईलाही फटका

DC vs KKR Point Table 2026 : कोलकाता आणि दिल्लीमध्ये झालेल्या सामन्यात केकेआर संघाने विजय मिळवला. केकेआरचा हा सलग चौथा विजय ठरला असून आता त्यांचा संघ कमबॅक करताना दिसत आहे. या विजयाने आता पॉइंट टेबलमध्ये केकेआरने झेप घेतली असून मुंबईला मागे सोडले असून सीएसकेपासून एक गुणाने मागे आहेत. केकेआर अंतिम चारमध्ये जाऊ शकतं की नाही जाणून घ्या.


मुंबई प्ले-ऑफला कशी पोहोचणार? 3 टीमच्या हातात भवितव्य, सगळ्यात सोपं इक्वेशन!

आयपीएलच्या यंदाच्या मोसमात मुंबईची कामगिरी फारशी चांगली झाली नाही. मुंबईने 10 पैकी फक्त 3 मॅच जिंकल्या आहेत, तर 7 सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला. 6 पॉईंट्ससह मुंबई नवव्या क्रमांकावर आहे. खात्यामध्ये फक्त 6 पॉईंट्स असले तरीही मुंबईच्या प्ले-ऑफला जायच्या शक्यता वाढल्या आहेत, याला कारण ठरलं आहे ते टेबलमध्ये टॉपवर असलेल्या टीमची कामगिरी ढासळली आहे. सनरायजर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स या टीम प्ले-ऑफमध्ये प्रवेश करतील, हे सध्याच्या स्थितीवरून दिसत आहे, पण उरलेल्या 2 जागांसाठी आठ टीममध्ये स्पर्धा आहे. 14 पॉईंट्सवर चौथी टीम प्ले-ऑफमध्ये प्रवेश करते, हे अनेकदा आयपीएलमध्ये दिसून आलं आहे. हैदराबादचे 11 सामन्यांमध्ये 14 तर पंजाबचे 10 सामन्यांमध्ये 13 पॉईंट्स आहेत, त्यामुळे आणखी एक विजय मिळवला तरी या दोन्ही टीम प्ले-ऑफमध्ये प्रवेश करतील. प्ले-ऑफच्या उरलेल्या दोन टीममध्ये मुंबईला प्रवेश करायचा असेल तर त्यांना त्यांचे उरलेले सर्व 4 सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागणार आहेत, ज्यामुळे 14 पॉईंट्ससह त्यांचा नेट रनरेटही सुधारेल. सध्याच्या पॉईंट्स टेबलच्या स्थितीनुसार मुंबईचं प्ले-ऑफला पोहोचणं आरसीबी, राजस्थान आणि गुजरातच्या कामगिरीवर अवलंबून आहे. या टीमची कामगिरी खराब झाली तर मुंबई प्ले-ऑफला पोहोचू शकते. आरसीबी, राजस्थान आणि गुजरात यांचे 10 सामन्यांमध्ये 6 विजयांसह 12 पॉईंट्स आहेत. आता उरलेल्या 4 सामन्यांमध्ये या तिन्ही टीमचा 3 सामन्यांमध्ये पराभव झाला तर या टीम जास्तीत जास्त 14 पॉईंट्सपर्यंत पोहोचतील. मुंबई इंडियन्सचे उरलेले सामने हे आरसीबी, राजस्थान, केकेआर आणि पंजाबविरुद्ध आहेत. हे चारही सामने मोठ्या फरकाने जिंकून मुंबई 14 पॉईंट्स आणि चांगल्या नेट रनरेटसह प्ले-ऑफमध्ये प्रवेश करू शकते. मुंबईला याचसोबत सीएसके आणि केकेआरकडूनही धोका आहे. सीएसकेचे 10 सामन्यांमध्ये 10 पॉईंट्स तर केकेआरचे 10 सामन्यात 9 पॉईंट्स आहेत, त्यामुळे या दोन्ही टीमने त्यांच्या उरलेल्या 4 सामन्यांपैकी कमीत कमी 2 सामन्यांमध्ये पराभूत व्हावं, अशी मुंबईची अपेक्षा असेल.


लखनऊ जिंकली पण फायदा मुंबई इंडियन्सचा झाला, प्लेऑफचं समीकरण पुन्हा फिरलं

आयपीएलमध्ये गुरुवारी लखनऊ सूपर जाएटसने डीएलएल मेथडनूसार आरसीबीचा 9 धावांनी पराभव केला आहे. पावसामुळे हा सामना 19 ओव्हरचा खेळवण्यात आला होता. या सामन्यात शेवटच्या ओव्हरपर्यंत गेलेल्या रोमहर्षक सामन्यात आरसीबी 203 धावाच करू शकली होती. त्यामुळे लखनऊ सूपर जाएटसने डीएलएल मेथडनूसार आरसीबीचा 9 धावांनी पराभव केला. लखनऊच्या या विजयाने आरसीबीला सर्वांत मोठा झटका बसला आहे. कारण नेट रनरेटच्या बळावर आरसीबीला टेबल टॉप करण्याची संधी होती. पण आरसीबीची ही संधी हुकली होती. लखनऊचे या विजयानंतर 10 सामन्यात 6 गुण झाले आहे. लखनऊने हा सामना जिंकून प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. पण आता पुढे एकही पराभव त्यांच्या आशेवर पाणी फिरू शकतो. लखनऊच्या या विजयाने मुंबई इंडियन्सला देखील मोठा फायदा झाला आहे.कारण लखनऊ जिंकल्याने मुंबई इंडियन्सच्या प्लेऑफच्या आशा जीवंत राहिल्या आहेत. आता लखनऊ आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघाचे प्रत्येकी 4 सामने उरले आहे. या चारही सामन्यात विजय मिळवून दोन्ही टीमना 14 गुणांपर्यंत पोहोचण्याची संधी आहे.पण दोन्ही टीमना इतर संघाच्या निकालावर अवलंबून रहावे लागणार आहे. पण या सगळ्यात मुंबई इंडियन्सला सर्वात आधी प्लेऑफमध्ये पोहोचायची संधी आहे.कारण मुंबईचा रनरेट हा लखनऊपेक्षा कमी आहे.त्यामुळे 14 गुण मिळवून मुंबई इंडियन्स पहिल्यांदा प्लेऑफमध्ये पोहोचणार आहे. विशेष म्हणजे मुंबईला इतर सामन्यांच्या निकालावरही अवलंबून रहावे लागणार आहे.


आम्हाला माहिती राजस्थानच्या त्या विकेट मिळाल्या की विजय आमचाच; मॅच संपल्यावर शुभमन गिलने सांगितला गेम प्लॅन

Shubman Gill News : राजस्थान रॉयल्स संघाला घरच्या मैदानावर गुजरात टायटन्स संघाने धूळ चारली आहे. राजस्थावर ७७ धावांनी विजय मिळवला. होल्डर आणि रशिदच्या फिरकीसमोर त्यांनी गुडघे टेकले. सामना संपल्यावर शुभमन गिलने गेम प्लॅन सांगितला.


Aravinda de Silva : ज्याच्या बळावर श्रीलंकेने जिंकला पहिला क्रिकेट वर्ल्ड कप त्याच्या घरात डेडबॉडी सापडल्याने एकच खळबळ

Aravinda de silva : अरविंद डी सिल्वा हे श्रीलंकन क्रिकेटमधील मोठं नाव आहे. त्यांच्या घरात श्रीलंकन एअरलाइन्सच्या माजी CEO चा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. अरविंद डी सिल्वा यांच्यामुळेच श्रीलंकेला पहिला क्रिकेट वर्ल्ड कप जिंकता आला.


गुजरातने बिघडवला सेट झालेला खेळ, मुंबईच्या प्ले-ऑफचं इक्वेशन पुन्हा बदललं!

गुजरातने दिलेल्या 230 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातचा 16.3 ओव्हरमध्ये 152 रनवर ऑलआऊट झाला, त्यामुळे गुजरातचा 77 रननी विजय झाला आहे. या विजयासोबतच गुजरात पॉईंट्स टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. गुजरात आणि हैदराबादचे 11 सामन्यांमध्ये 7 विजयांसह 14 पॉईंट्स आहेत, पण हैदराबादचा नेट रनरेट चांगला असल्यामुळे ते पहिल्या क्रमांकावर आहेत. आरसीबीने 10 सामन्यांमध्ये 6 तर राजस्थानने 11 सामन्यांमध्ये 6 विजय मिळवले आहेत, त्यामुळे या दोन्ही टीम चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत. तर पंजाबचे 10 सामन्यांमध्ये 13 पॉईंट्स असल्यामुळे ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत. सीएसकेचे 10 सामन्यांमध्ये 10, केकेआरचे 10 सामन्यांमध्ये 9, दिल्लीचे 11 सामन्यांमध्ये 8 आणि मुंबई-लखनऊचे 10 सामन्यांमध्ये 6 पॉईंट्स आहेत. गुजरातच्या विजयामुळे मुंबईसाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. IPL च्या प्ले ऑफसाठी 16 पॉईंट्स सुरक्षित मानले जातात, तर 18 पॉईंट्ससह प्ले ऑफचं तिकीट निश्चित होतं. गुजरातने विजय मिळवल्यामुळे आता 3 पैकी एक सामना जिंकूनही ते प्ले ऑफमध्ये पोहोचतील. गुजरातच्या या विजयाचा फटका मुंबईला बसला आहे, कारण मुंबईचे सध्या फक्त 6 पॉईंट्स आहेत. उरलेल्या 4 सामन्यांमध्ये विजय मिळवला तरी मुंबई 14 पॉईंट्सवरच जाऊ शकते. गुजरात जिंकल्यामुळे आता मुंबईला त्यांचे उरलेले सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागणार आहेत, कारण त्यांना नेट रनरेटही सुधारावा लागणार आहे. मुंबईचा नेट रनरेट हा सध्या मायनस 0.649 आहे. याशिवाय मुंबईला हैदराबाद, पंजाब, आरसीबी आणि राजस्थान यांच्या निकालांवरही अवलंबून राहावं लागणार आहे.


RR vs GT Live Streaming : गुजरातसमोर राजस्थानचं आव्हान, शुबमनसेना गेल्या पराभवाचा हिशोब करणार?

Rajasthan Royals vs Gujarat Titans IPL 2026 Live Scorecard : राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात शनिवारी 9 मे रोजी 2 गुणांसाठी कडवी झुंज पाहायला मिळणार आहे.


दिल्लीच्या सातव्या पराभवानंतर अक्षर पटेल वैतागला; कोणी सर्वाधिक चुका केल्या? सगळं सांगून टाकलं

Axar Patel On DC Loss Against KKR: कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आयपीएल 2026 चा सामना रंगला. या सामन्यात दिल्लीचा पराभव झाला. या पराभवानंतर कर्णधार अक्षर पटेल काय म्हणाला पाहा.


IPL foreign players tax: IPL मधील विदेशी खेळाडू टॅक्स कसा वाचवतात? काय आहे ‘DTAA’ करार, ज्यामुळे मिळते कोट्यवधींची सवलत

IPL Foreign Players Taxation Rules Explained: आयपीएलमध्ये खेळाडूंवर कोटींची उधळण होत असली, तरी त्यांच्या हातात पडणारी रक्कम आणि सरकारी कर याचे गणित मोठे आहे.


‘हनी ट्रॅप’चा धोका, सुरक्षेचीही चिंता; नियमभंगावरून ‘बीसीसीआय’चा ‘आयपीएल’ फ्रँचायझींना कडक इशारा

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी आणि भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी बीसीसीआयच्या 'एसीयू'ने १० फ्रँचायझींना सविस्तर मार्गदर्शक तत्त्वे (SOP) जारी केली आहेत.


कितीही सिक्स मारा, विकेट घ्या, फॉलोअर्स ठरवणार खेळाडूची किंमत, T20 लीगने बदलली लिलावाची पद्धत!

मुंबई : जगातली सगळ्यात मोठी क्रिकेट लीग असलेल्या आयपीएलमध्ये खेळाडूंवर कोट्यवधींची बोली लागते. फक्त दोन महिने आयपीएल खेळाडू फक्त भारतीयच नाही तर परदेशी खेळाडूही करोडपती होतात. जगभरातल्या सगळ्या टी-20 लीगमध्ये आयपीएल वेगळी असण्याचं कारण म्हणजे खेळाडूंवर लागणारी बोली, पण आता टी-20 क्रिकेटमध्ये खेळाडू विकत घेण्यासाठी भलतीच पद्धत अवलंबली जाणार आहे.सध्याच्या क्रिकेटमध्ये खेळाडूंची ब्रॅण्ड व्हॅल्यू किती महत्त्वाची आहे, याचं उदाहरण समोर आलं आहे. लंका...


विराट भैय्यानेच मला सांगितलं होतं; कोहलीला दुसऱ्या बॉलवर बोल्ड केलेल्या प्रिन्स यादवचा मोठा खुलासा

prince yadav on Virat Kohli : आयपीएलमध्ये युवा खेळाडू आपल्या चमकदार कामगिरीने सर्वत्र छाप पाडताना दिसत आहेत. गुरूवारी झालेल्या सामन्यात विराट कोहलीला शून्यावर बोल्ड करणाऱ्या प्रिन्स यादवने सामना संपल्यावर कोहलीनेच त्याला दिलेल्या एका गुरूमंत्राचा त्याने वापर केल्याचं सांगितलं. नेमका काय गुरूमंत्र दिलेला? जाणून घ्या.


आशियाई क्रीडा स्पर्धेस विनेश फोगट मुकणार; भारतीय कुस्ती महासंघाकडून निवड चाचणी निकषात बदल

निवृत्ती मागे घेऊन मॅटवर परतलेल्या विनेशने वरिष्ठ राष्ट्रीय किंवा फेडरेशन चषक स्पर्धेत सहभाग न घेतल्याने नव्या तांत्रिक नियमांनुसार ती आशियाई स्पर्धेसाठी अपात्र ठरली आहे.


पाकिस्तानचा कर्णधार रोहित शर्मा? थेट टीव्हीवर केली घोषणा, संपूर्ण जगाला बसला धक्का! नक्की झाले काय?

Bangladesh vs Pakistan : पाकिस्तान विरुद्ध बांग्लादेश यांच्यामध्ये कसोटी सामना सुरु आहे या सामन्यामध्ये ऑन-एअर चुकीमुळे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पाकिस्तानची प्लेइंग 11 दाखवण्याऐवजी टीव्हीवर भारतीय संघाची प्लेइंग 11 दाखवण्यात आली.


सूर्यकुमार यादव ऐवजी हा विस्फोटक फलंदाज होणार टी20 कर्णधार, टीम इंडियात होणार सत्ता परिवर्तन

मीडिया रिपोर्ट्सनुसार सूर्यकुमार यादवकडून टीम इंडियाच्या टी20 संघाचं कर्णधारपद काढून घेतलं जाऊ शकतं. येत्या महिन्यात भारतीय संघाच्या सिलेक्टर्सची मिटिंग होणार असून यात सूर्यकुमार ऐवजी एका विस्फोटक फलंदाजाकडे संघाचं नेतृत्व सोपवलं जाऊ शकतं.


Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशी 21 व्या वयानंतर खेळू शकणार नाही? इंग्लंडच्या माजी कॅप्टनची मोठी भविष्यवाणी

Vaibhav Sooryavanshi Team India Debut : आयपीएल 2026 चा सर्वात घातक खेळाडू म्हणून सध्या कुणाकडं पाहिलं जात असेल तर तो खेळाडू म्हणजे वैभव सूर्यवंशी... पोरानं फक्त 15 वर्षांच्या या खेळाडूने या सीझनमध्ये अनेक मोठे विक्रम मोडीत काढले आहेत. वैभवने या सीझनमध्ये आतापर्यंत 10 मॅचेसमध्ये 40.40 च्या सरासरीने 404 रन्स केले आहेत. विशेष म्हणजे, त्याचा स्ट्राईक रेट 237.64 इतका प्रचंड आहे, जो टी-20 क्रिकेटमध्ये अत्यंत दुर्मिळ मानला जातो. त्याने या सीझनमध्ये...


भारतीय संघाचा म्होरक्या बदलणार, सूर्याचा पत्ता होणार कट, नवीन कॅप्टन कोण?

Team India New Captain : भारतीय टी-२० क्रिकेट संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याच्या जागी आता नवीन कर्णधाराची नियुक्ती होणार आहे. सूर्याचा पत्ता कट होणार असल्याची माहिती समोर आली आहे. कोण आहे तो जाणून घ्या.